S400 Air Defense System

Tushar
14 May 2025
Technology

S-400 सिस्टीम 400 किलोमीटर पर्यंत मारक क्षमता ठेवते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सध्या खूप ताणलेले आहेत. S-400 ट्रायम्फ हे रशियाच्या अल्माझ-एंटे कंपनीने बनवले आहे. हे एक आधुनिक मिसाइल सिस्टीम आहे. हे हवेतील धोके ओळखू शकते. उदाहरणार्थ, विमाने, ड्रोन, क्रूझ मिसाइल आणि बॅलिस्टिक मिसाइल. हे सिस्टम 400 किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर हल्ला करू शकते. हे मिसाइलच्या क्षमतेवर अवलंबून असते. त्याचे रडार 600 किलोमीटर दूर पर्यंतचे लक्ष्य देखील पाहू शकते. हे खूप वेगाने लक्ष्यांवर हल्ला करू शकते.
भारताने 7 मे रोजी मध्यरात्री पाकिस्तानात एअर स्ट्राइक केला. पाकिस्तान आणि POK मधील 9 दहशतवादी तळ उडवले. भारताने ही कारवाई फक्त दहशतवाद्यांविरुद्ध केली होती. भारत सरकारने कारवाईनंतर पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. आमची कारवाई फक्त दहशतवादाविरुद्ध आहे. आम्हाला तणाव वाढवायचा नाही, असं सांगितलेलं. पण तरीही चवताळलेल्या पाकिस्तानने आपली नीचता दाखवून दिली. 7 आणि 8 मे च्या रात्री पाकिस्तानने भारतातील 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठानकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, अदमपुर, बठिंडा, चंडीगढ़, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज सारख्या सैन्य ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पण पाकिस्तानचे हे हल्ले अयशस्वी ठरले. हे सर्व हल्ले भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने भेदून लावले. काल रात्री भारतासाठी S-400 सिस्टिम सुरक्षाकवच ठरली. सुदर्शन चक्राप्रमाणे S-400 ने पाकिस्तानच्या सीमेतून येणारे ड्रोन्स, मिसाइल्स हवेतच नष्ट केले. जाणून घ्या भारताच्या या खास अस्त्राबद्दल.