दिवेआगर समुद्रकिनारा

Payal Bhegade
25 Apr 2023
Blog

दिवेआगर

दिवेआगर हे महाराष्ट्र राज्यातील एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. कोकणातील सर्व विष्णुमंदिरांमध्ये सर्वांत उंच आणि सुबक मूर्ती आहे. ही मूर्ति एकच दगडात कोरलेली आहे. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला दशावतार कोरले आहेत. महाराष्ट्र राज्यातील किनारपट्टीवरील सर्वात सुरक्षित समुद्रकिनाऱ्यांपैकी एक म्हणुन दिवेआगर ची ख्याती आहे. याच्या जवळपास हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन ही पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. दिवेआगर हे महाराष्ट्रातील कोकण विभागातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात एक गाव आहे. हे ठिकाण स्वच्छ आणि वालुकामय समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. इथले सुवर्ण गणेश मंदिरातील गणपतीच्या सोन्याच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. इथून समुद्रकिनारा साधारणपणें 4 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी माणसाची वस्ती नसल्याकारणाने इथला समुद्रकिनारा एकदम स्वच्छ आहे.
दिवेआगर पर्यटन स्थळ हे महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्यावरील एक किनारपट्टीचे ठिकाण आहे. दिवेआगरच्या एका बाजूला सह्याद्री पर्वत आहे आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र आहे. दिवेआगर अलिबाग शहराच्या दक्षिणेस 81 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईपासून 182 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून 163 किलोमीटर अंतरावर आहे. कोकण विभागात मुख्य ऋतू म्हणजे पावसाळा. कारण पावसाळयात इथले सौदर्य खुप छान असते. कोकण किनारपट्टीवर साधारणपणें 2500 मिमी ते 4500 मिमी इतका पाउस पडतो तर हवामान दमट आणि उबदार असते. पावसाळ्यात येथील तापमान 30 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते तर उन्हाळ्यात तापमान गरम आणि दमट होते. या वेळी येथील तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते. हिवाळ्यात येथील तापमान अनुकूल असते तर हवामान थंड आणि कोरडे असते.
दिवेआगर नारळ, सुरू (कॅसुरीना) आणि सुपारीच्या झाडांनी झाकलेल्या आणि दाट मानव वस्ती नसणाऱ्या किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथील समुद्रकिनारे शांत आहेत.दिवेआगर व्यतिरिक्त तुम्ही पुढीप्रमाणे स्थळे पाहू शकता. श्रीवर्धन – दिवेआगर पासून दक्षिणेला 23 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी सुंदर, लांब आणि स्वच्छ समुद्रकिनारा पाहायला मिळतो. श्रीवर्धन हे दिवेआगरशी सुंदर किनारपट्टी रस्त्याने जोडलेले आहे. हरिहरेश्वर – दिवेआगर समुद्रकिनारा पासून दक्षिणेला 3 किलोमीटर अंतरावरील ठिकाण आहे. हे ठिकाण प्राचीन शिव आणि काळभैरव मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. येथील मंदिर खडकाळ समुद्रकिनारा आणि किनारपट्टीच्या धूप प्रक्रियेद्वारे कोरलेल्या विविध भौगोलिक संरचनांसाठी देखील ओळखले जाते. वेळास किनारा – हरिहरेश्वरच्या दक्षिणेला 12 किलोमीटर अंतरावर कासव महोत्सवासाठी वेळास किनारा प्रसिद्ध आहे.