वेताळ प्रतिष्ठानतर्फे यशवंत गडाची स्वच्छता

Payal Bhegade
09 Feb 2023
Historical

वेताळ प्रतिष्ठानतर्फे
यशवंत गडाची स्वच्छता

वेंगुर्ले शिवकालीन ऐतिहासिक वारसा संवर्धनाची भावना आणि सामाजिक बांधिलकी जपत वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे स्वच्छता व श्रमदान उपक्रम अंतर्गत रेडी येथील ऐतिहासिक यशवंत गडाची श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली. वेताळ प्रतिष्ठान नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रमातून समाजहिताचे कार्य करत असते. वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्गकडून प्रतिवर्षी गड स्वच्छता, सागरी किनारा स्वच्छता, श्रमदान उपक्रम राबविण्यात येतात. पर्यटनाच्या दृष्टीने यशवंत गड येथे पर्यटक येत असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने स्थळाची सुस्थिती अबाधित राहणे आणि ऐतिहासिक वारसा संवर्धनसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. गड सुसज्ज राहण्यासाठी स्थानिक शिवप्रेमी सातत्याने संवर्धनाकरिता प्रयत्नशील असून त्यामध्ये प्रतिष्ठान दरवर्षी आपला सहभाग दर्शवत असते. स्वच्छता मोहिमेत वेताळ प्रतिष्ठानच्या ४० हुन अधिक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेत गड परिसर स्वच्छ करण्यात आला.