350 वा शिवराज्याभिषेक सोहळा

Rohini
01 Jun 2023
Historical

350 वा शिवराज्याभिषेक सोहळा

रायगडावर 6 जून 1674 रोजी झालेला शिवराज्याभिषेक सोहळा हा रायगडावर आलेल्या प्रत्येकासाठी जणू दसरा दिवाळीच्या उत्सवासारखाच होता.लाडक्या राजाला सिंहासनावर बसलेला पाहण्यासाठी असंख्य जनता रायगडावर उपस्थित होती. शिवराज्याभिषेक सोहळा ज्यांनी याची देही याची डोळा अनुभवला त्या प्रत्येकाच्या मनात आपण धन्य झालो ही एकच भावना होती.
शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी कित्येक महिने सुरू होती ,या सोहळ्याच्या नऊ दिवस आधी या राज्याभिषेकाशी संबंधित अनेक विधी पार पाडल्या होत्या ,6 जून 1674 ला राज्याभिषेक झाला.
6 जून 1674 रोजी पहाटे उठून मंत्रोच्चार ,अंघोळ करून झाल्यावर कुलदैवतला स्मरून राज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली होती. शिवाजी महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते.राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. अष्टप्रधानातील आठ प्रधान विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. वेगवेगळ्या नद्यांच्या पाण्याने शिवाजी महाराजांचे अभिषेक करण्यात आले होते. राज्याभिषेकाच्या दिवसापासूनच स्वराज्यातील राजपत्रांवर "क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिवछत्रपती "असे नमूद करणे सुरू झाले.
शिवरायांनी राज्याभिषेकाच्या दिवसापासून नवीन शक सुरू केल्या या शकाला "शिवराज्याभिषेक शक "असे संबोधले जाते. स्वराज्यात अधिकृतरित्या शिवरायांनी अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली आणि अनेक सरदार व मंत्री यांना स्वराज्याची कामे व जबाबदाऱ्या वाटून दिल्या.
महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 दिवशी राज्याभिषेक झाला आणि आपल्या स्वराज्याला छत्रपती मिळाले.
या ऐतिहासिक घटनेचे महत्त्व दृढ करण्यासाठी शिवप्रेमी 6 जून 1674 हा दिवस "शिवराज्याभिषेक दिन सोहळा " म्हणून साजरा करतात.
किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मोठा कार्यक्रम होतो. मोठ्या जल्लोषात शिवरायांच्या वंशजाकडून शिवप्रेमींच्या उपस्थितीत हा दिवस साजरा केला जातो.


350 th शिवराज्याभिषेक सोहळा

यंदा 1 आणि 2 जून 2023 रोजी रायगडावर साजरा होणार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा; विविध कार्यक्रमांचे आयोजन, जाणून घ्या कशी असेल तयारी.......

महाराष्ट्र शासन 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा 1 आणि 2 जून 2023 रोजी रायगडावर साजरा करणार आहे. यानिमित्ताने सर्व जिल्ह्यांमध्ये वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा प्रेरणा देणारा हा दिवस असून त्यानिमित्त राज्यात वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी स्पर्धा, महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांवर शिववंदना, जाणता राजा महानाट्याचे राज्यभर प्रयोग आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
सोहळ्यानिमित्त राज्यात वर्षभर विविध कार्यक्रमाच्या आयोजनासोबतच सांस्कृतिक कार्य विभागाने छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय अध्ययन केंद्र, आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्राची निर्मिती, राज्यात अकृषिक विद्यापीठस्तरावर छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास केंद्र, तज्ज्ञ समितीमार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित साहित्य आणि संदर्भ साहित्याचे डिजिटायझेशन हे उपक्रम प्रस्तावित केले आहेत. सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी भोजन, पाणी, मंडप, आरोग्य सुविधा यांची चोख व्यवस्था प्रशासनाने करावी. गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

सांस्कृतिक कार्य विभागाने प्रस्तावित केल्यानुसार भारतातील विविध राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी किंवा मराठा साम्राज्य, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडीत देशभरात २० अभ्यास केंद्रे निवडली जाणार आहेत. त्यासाठी दिल्ली, दमण दिव, तंजावर, अंदमान, बेळगाव, बडोदा, श्रीशैलम, उदयपूर, भोपाळ, दार्जिलिंग, अहमदाबाद, गुवाहाटी, कोलकाता, पानिपत, भुवनेश्वर, लडाख, विजयपुरा, पाटणा, अमृतसर, पणजी ही ठिकाणे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत.

शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष होऊन त्या घटनेचे महत्त्व आजही तितकेच आहे. तमाम मराठी जनांसाठी ही महत्त्वाची घटना आहे. यावर्षी ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा असल्याने त्याचे आयोजन राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासनाने त्यासाठी जय्यत तयारी करावी. सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांची गैरसोय होणार नाही यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे,

सोहळ्यानिमित्त रायगडावर रोषणाई करण्यात येणार आहे त्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाशी समन्वय ठेवावा कुठलीही अडचण येता कामा नये अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. सोहळ्याच्या दिवशी शिवभक्तांसाठी मोफत बससेवा महाड ते पाचाड या दरम्यान सुरू करण्याचे ठरवले.